-
पणजी, गोवा येथे नुकतीच 'भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या (India International Science festival)' ७ व्या आवृत्तीला सुरुवात झाली आहे.
ठळक मुद्दे
-
केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान, डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते सदर महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.
-
‘आझादी का अमृत महोत्सव – समृद्ध भारतासाठी सर्जनशीलता, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम साजरे करणे (Azadi Ka Amrit Mahotsav’ – “Celebrating Creativity, Science, Technology and Innovation for a prosperous India)' ही या ४ दिवसीय विज्ञान महोत्सवाची थीम आहे.
-
पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव २०१५ मध्ये आयआयटी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.