• केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते 'भारत हवामान बदल ज्ञान पोर्टलचे (India Climate Change Knowledge Portal)' नुकतेच अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • प्रकाश जावडेकर यांच्या मते भारताने २०२० पूर्वीची हवामान कृती लक्ष्ये प्रत्यक्षपणे गाठली आहेत.

  • भारत हवामान बदलासाठी जबाबदार नसला तरी ते आव्हान कमी करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडत आहे.

  • हवामान बदलाच्या समस्येवर लक्ष देण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सरकारमार्फत घेण्यात येत असलेल्या सर्व प्रमुख गोष्टी पोर्टलवर उपलब्ध करण्यात येतील.