-
भारताकडून मॉरिशसला ३० टन तांत्रिक उपकरणे व साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे. तेल गळतीबाबतच्या या संकटात भारताकडून महत्वपूर्ण कामगिरी बजावली जात आहे.
ठळक मुद्दे
-
तेल गळतीबाबत कार्यपद्धतीची आखणी करण्यासाठी भारताने 'मिशन सागर' अंतर्गत १० सदस्यीय भारतीय तटरक्षक दलाच्या गटाची नियुक्ती केली आहे.
-
मॉरिशसच्या पर्यावरणीय संवेदनशील प्रदेशात ऑगस्ट २०२० मध्ये जपानच्या वाहकाने कोरल रीफ किनाऱ्यावर धडक दिल्यामुळे शेकडो टन तेल पाण्याच्या पृष्ठभागावर पसरले गेले.
-
तेल गळती आटोक्यात ठेवण्यासाठी भारतामार्फत उपयुक्त अशी उपकरणेही पाठवण्यात आली आहेत.
'मिशन सागर' बाबत महत्वपूर्ण माहिती
-
क्षेत्रामधील सर्वांसाठी मिशन सागर ही एक प्रकारची सुरक्षा वाढ आहे.
-
सागरीदृष्ट्या शेजारी असणाऱ्या देशांशी आर्थिक आणि सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी २०१५ मध्ये हे मिशन सुरू करण्यात आले होते.