• केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम (Micro Small and Medium Enterprises - MSME) उद्योगमंत्री श्री. नितीन गडकरी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (Confederation of Indian Industries - CII) द्वारा आयोजित 'इंडिया @ ७५ समिट - मिशन २०२२' ला संबोधित केले. या शिखर परिषदेत ‘भारतातील तंत्रज्ञानाचे पुनरुत्थान’ या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राबद्दल (MSME) ठळक मुद्दे

  • MSME क्षेत्राचा विस्तार MSME च्या नवीन संकल्पनेसह झाला असून वाढीव गुंतवणूकीचे मूल्य ५० कोटी पर्यंत असून उलाढाल २५० कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.

  • भारतातील MSME क्षेत्रातील निर्यातीचा मार्ग तंत्रज्ञानाच्या आधाराने वाढवता येऊ शकतो, ज्यायोगे सहायक घटकांची संख्याही वाढेल अशी अपेक्षा आहे.

  • भारतीय उत्पादकास काही क्षेत्रांतील वाढीव आयात शुल्क मदत करेल.