• संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषदेमार्फत (UN Conference on Trade and Development - UNCTAD)' नुकताच 'जागतिक गुंतवणूक अहवाल (World Investment Report)' २०२१ जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • सदर अहवालानुसार भारत जागतिक स्तरावर ५ व्या स्थानावर विराजमान झाला आहे.

  • परकीय प्रत्यक्ष गुंतवणूकीबाबत (Foreign Direct Investments - FDI) कोविड-१९ साथीचा तीव्र फटका बसला आहे.

  • सन २०२० मध्ये FDI प्रवाह ३५ टक्क्यांनी घटून १ ट्रिलियन डॉलर्स झाला आहे.

  • २०१९ मध्ये हा प्रवाह १.५ ट्रिलियन डॉलर्स इतका होता.

UN बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.