-
भारताचे सरन्यायाधीश (CJI) न्या. एन. व्ही. रमण आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा येथे भारताच्या पहिल्या 'आंतरराष्ट्रीय लवाद आणि मध्यस्थी केंद्राचे (International Arbitration and Mediation Centre - IAMC)' उद्घाटन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर केंद्र निर्मिती प्रक्रियेमध्ये सिंगापूर आणि यूकेसारख्या देशांतील आंतरराष्ट्रीय प्रशंसित मध्यस्थांचा समावेश आहे.
तेलंगणाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: के. चंद्रशेखर राव हे सध्या तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
-
राज्यपाल: तमिलीसाई सौंदराराजन हे सध्या तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
-
स्थापना वर्ष: २ जून २०१४ रोजी तेलंगणा राज्याची स्थापना करण्यात आली होती. २ जून हा 'तेलंगणा दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो.
-
राजधानीचे ठिकाण: हैद्राबाद हे तेलंगणाच्या राजधानीचे ठिकाण आहे.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने तेलंगणा हे देशात ११ व्या स्थानावर विराजमान आहे.