• पश्चिम बंगालचे राज्यपाल श्री. जगदीप धनखार यांच्यामार्फत पश्चिम बंगालमध्ये ११ व्या 'राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचे (Rashtriya Sanskriti Mahotsav)' उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • राष्ट्रीय संस्कृती महोत्सव हा विविधतेत एकता हा विचार साजरा करण्यासाठी २०१५ पासून 'एक भारत श्रेष्ठ भारत' कार्यक्रमांतर्गत सांस्कृतिक मंत्रालयातर्फे राबविण्यात येणारा प्रमुख कार्यक्रम आहे.

  • सदर कार्यक्रमाचे उद्घाटन राज्य सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री श्री. प्रह्लादसिंग पटेल यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे.

पश्चिम बंगाल राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: २६ जानेवारी १९५० रोजी पश्चिम बंगाल राज्याची स्थापना झाली होती.

  • मुख्यमंत्री: ममता बॅनर्जी या सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.

  • राज्यपाल: जगदीप धनखार हे राज्यपाल पदावर आहेत.

  • राजधानीचे ठिकाण: कलकत्ता हे पश्चिम बंगालच्या राजधानीचे ठिकाण आहे.