• उत्तराखंडमध्ये नुकतेच भारतातील पहिल्या क्रिप्टोगॅमिक गार्डनचे (Cryptogamic Garden)' उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • देहरादूनच्या देवबन भागामध्ये सुमारे ५० वेगवेगळ्या प्रजातींसह सदर गार्डनचे अनावरण संपन्न झाले आहे.

  • सदर गार्डन ९ हजार फूट उंचीवर वसले असून त्याने ३ एकर इतके क्षेत्र व्यापले आहे.

  • क्रिप्टोगेम म्हणजे 'छुपे पुनरुत्पादन' अर्थात ज्यामध्ये बियाणे अथवा फुले तयार होत नाहीत.

उत्तराखंड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: ९ नोव्हेंबर २००० साली उत्तराखंड राज्याची स्थापना झाली होती.

  • मुख्यमंत्री: तीरथसिंग रावत हे सध्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • राज्यपाल: बेबी राणी मौर्य सध्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • राजधानी: उत्तराखंड राज्याच्या गैरसैंण (उन्हाळी) आणि देहरादून (हिवाळी) अशा २ राजधान्या आहेत.