• हिंदी महासागर रिम संघटना (Indian Ocean Rim Association - IORA) मंत्रिमंडळाच्या २० व्या आवृत्तीची बैठक संयुक्त अरब अमिरातीच्या (United Arab Emirates - UAE) अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपन्न झाली आहे.

ठळक मुद्दे

  • 'हिंदी महासागरात सामायिक भाग्य आणि समृद्धीकडे वाटचाल करणे (Promoting a Shared Destiny and Path to Prosperity in the Indian Ocean)' ही सदर बैठकीची थीम होती.

  • भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाच्या व्ही. मुरलीधरन यांनी केले.

  • २०२१-२३ या कालावधीसाठी श्रीलंकेने IORA च्या उपाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.

IORA बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: IORA म्हणजेच Indian Ocean Rim Association अर्थात हिंदी महासागर रिम संघटना होय.

  • सरचिटणीस: नोम्व्यूयो नोकवे हे सध्या IORA च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १९९७ साली IORA ची स्थपणा करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: एबेने, मॉरिशस हे IORA च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सदस्यत्व: IORA चे २३ सदस्य देश आहेत.