-
तेलंगणातील रामगुंडम येथे भारतातील सर्वात मोठा 'तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प (floating solar power plant)' उभारण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
-
मे २०२१ मध्ये तो उघडण्यात येण्याची शक्यता आहे.
-
प्रकल्पाची किंमत अंदाजे ४२३ कोटी रुपये आहे.
तेलंगणाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: के. चंद्रशेखर राव हे सध्या तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
-
राज्यपाल: तमिलीसाई सौंदराराजन हे सध्या तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
-
स्थापना वर्ष: २ जून २०१४ रोजी तेलंगणा राज्याची स्थापना करण्यात आली होती. २ जून हा 'तेलंगणा दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो.
-
राजधानीचे ठिकाण: हैद्राबाद हे तेलंगणाच्या राजधानीचे ठिकाण आहे.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने तेलंगणा हे देशात ११ व्या स्थानावर विराजमान आहे.