-
.'आंतरराष्ट्रीय योग महोत्सव (International Yoga Festival)' उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये नुकताच सुरू झाला आहे.
ठळक मुद्दे
-
उत्तराखंडचे कृषीमंत्री सुबोध उनियाल, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख (Akhil Bharatiya Akhada Parishad - ABAP) नरेंद्र गिरी आणि ऋषिकेशमधील पतंजली योगपीठाचे अध्यक्ष आचार्य बालकृष्ण यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाचे (International Yoga Festival) उद्घाटन संपन्न झाले
-
उत्तराखंड पर्यटन विकास मंडळ (Uttarakhand Tourism Development Board - UTDB) आणि गढवाल मंडळ विकास निगम (Garhwal Mandal Vikas Nigam - GMVN) यांनी संयुक्तपणे सदर महोत्सवाचे आयोजन केले आहेत.
उत्तराखंड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: ९ नोव्हेंबर २००० साली उत्तराखंड राज्याची स्थापना झाली होती.
-
मुख्यमंत्री: त्रिवेन्द्रसिंग रावत हे सध्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.
-
राज्यपाल: बेबी राणी मौर्य सध्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.
-
राजधानी: उत्तराखंड राज्याच्या गैरसैंण (उन्हाळी) आणि देहरादून (हिवाळी) अशा २ राजधान्या आहेत.