• उत्तराखंडमधील रानीखेत येथे नुकतेच भारतातील पहिल्या गवत संरक्षक संस्थेचे (Grass conservatory) उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • गवताच्या प्रजातींच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करणे तसेच त्यांच्या संवर्धनाला चालना देणे या मुख्य उद्देशासाठी ही संरक्षक संस्था उभारण्यात आली आहे.

उत्तराखंड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: ९ नोव्हेंबर २००० साली उत्तराखंड राज्याची स्थापना झाली होती.

  • मुख्यमंत्री: पुष्कर सिंग धामी हे सध्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • राज्यपाल: गुरमित सिंग हे सध्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • राजधानी: उत्तराखंड राज्याच्या गैरसैंण (उन्हाळी) आणि देहरादून (हिवाळी) अशा २ राजधान्या आहेत.