• भारतीय हवामान विभागामार्फत (India Meteorological Department - IMD) ओडीशातील बालासोर जिल्ह्यात भारतातील पहिले ‘वादळ संशोधन परीक्षण केंद्र (Thunderstorm Research Testbed)’ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • विजेच्या तडाख्याने होणारी जिवीत हानी व मालमत्तेचे नुकसान कमी करणे हे सदर संशोधन परीक्षण केंद्राचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारतीय हवामान विभाग, संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) यांच्या सहकार्याने ही सुविधा स्थापन करण्यात येणार आहे.

IMD बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: IMD म्हणजेच India Meteorological Department अर्थात भारत हवामान विभाग होय.

  • महासंचालक: मृत्युंजय महापात्रा हे सध्या IMD च्या पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १८७५ साली IMD ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे IMD च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.