• भारताचे मुख्य सरन्यायाधीश शरद बोबडे आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी नागपूर येथील न्यायिक अधिकारी प्रशिक्षण संस्थेत (Judicial Officers Training Institute) 'न्याय कौशल (Nyay Kaushal)' नावाच्या व्हर्च्युअल न्यायालयाचे संयुक्तपणे उद्घाटन केले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर न्याय कौशल तंत्रज्ञानाचा उपयोग करून गरजू लोकांना त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त माध्यम ठरणार आहे.

  • सर्वोच्च न्यायालय, कोणतेही उच्च न्यायालय तसेच देशभरातील जिल्हा न्यायालयांमधील प्रकरणे इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या सहाय्याने नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल अशी अपेक्षा आहे.

  • सदर व्हर्च्युअल न्यायालय हे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील काटोल येथून कार्यरत राहणार आहे.