• मुख्यमंत्री श्री. कॉनराड संगमा यांच्यामार्फत मेघालयमध्ये भारतातील सर्वात लांब रस्ता कमानी पूलाचे (Road Arch Bridge) नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर प्रकल्प हा २०१३ मध्ये मंजूर करण्यात आला होता तर २०१४ मध्ये त्याचे काम सुरू झाले होते.

  • पुलाचे काम डिसेंबर २०१८ मध्ये पूर्ण झाले होते.

  • राज्याच्या पर्यटन क्षेत्राला या उत्तम रचनेमुळे चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

मेघालय राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: कॉनराड संगमा हे सध्या मेघालय राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: २१ जानेवारी १९७२ रोजी मेघालय राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी: शिलॉंग ही मेघालय राज्याची राजधानी आहे.