• मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमध्ये 'जागतिक संगीत तानसेन महोत्सवाच्या (World Sangeet Tansen Festival)' ९७ व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर महोत्सव २५ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान ५ दिवस आयोजित केला आहे.

  • या महोत्सवात भारतीय तसेच परदेशी कलाकार सहभागी होणार आहेत.

मध्य प्रदेश बाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: शिवराजसिंह चौहान हे सध्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • राज्यपाल: मंगूभाई छगनभाई पटेल सध्या मध्य प्रदेशच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • राज्यनिर्मिती वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी: भोपाळ ही सध्या मध्य प्रदेशची राजधानी आहे.

  • राज्याची विशेषता: मध्य प्रदेश हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे.