• व्याघ्र प्रकल्पातील भारतातील पहिल्या हॉट एअर बलून वन्यजीव सफारीचे (Hot Air Balloon Wildlife Safari) मध्य प्रदेशचे वनमंत्री श्री. विजय शहा यांच्या हस्ते जगप्रसिद्ध बांधवगड व्याघ्र प्रकल्पात अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • आफ्रिकेच्या जंगलांप्रमाणेच भारतातील पर्यटकही आता हॉट एअर बलून वन्यजीव सफारीचा आनंद घेतील अशी अपेक्षा आहे.

मध्य प्रदेश बाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: शिवराजसिंह चौहान हे सध्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • राज्यपाल: आनंदीबेन पटेल सध्या मध्य प्रदेशच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • राज्यनिर्मिती वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी: भोपाळ ही सध्या मध्य प्रदेशची राजधानी आहे.

  • राज्याची विशेषता: मध्य प्रदेश हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे.