• ग्रामीण भागात व्यापक प्राथमिक आरोग्य सेवा देण्यासाठी आयुष्मान भारत कार्यक्रमांतर्गत आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात कर्नाटक अव्वल स्थानावर विराजमान झाले आहे.

ठळक मुद्दे

  • सन २०२० - २०२१ मध्ये हा प्रकल्प राबविण्यात कर्नाटक आघाडीवर राहिले आहे.

कर्नाटक राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: बी. एस. येडियुरप्पा हे सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत.

  • राज्यपाल: वजुभाई वाला हे सध्या कर्नाटकच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • राज्य स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी शहर: बंगळुरू ही कर्नाटकची राजधानी आहे.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने कर्नाटक देशात ६ व्या स्थानावर आहे.