• छत्तीसगडमध्ये नुकतेच 'राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव (National Tribal Dance Festival)' २०२१ चे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे

  • राज्य सरकारमार्फत पर्यटन विकास योजनेचा एक भाग म्हणून सदर नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

  • झारखंड राज्याचे मुख्यमंत्री श्री. हेमंत सोरेन तसेच छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्री. भूपेश बाघेल यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले.

छत्तीसगड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: भूपेश बाघेल हे सध्या छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • राज्यपाल: अनुसूया उईके या सध्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर २००० रोजी छत्तीसगड राज्याची स्थापना करण्यात आली होती.

  • राजधानी शहर: नवा रायपूर हे छत्तीसगडच्या राजधानीचे शहर आहे.