-
सदर योजनेचे उद्दिष्ट आहे की अशा पायाभूत सुविधांची स्थापना केली जाईल जे शहरी परिवर्तनासाठी मजबूत साखळी सुनिश्चित करेल. 'कायाकल्प आणि नागरी परिवर्तनासाठी अटल मिशन (Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation - AMRUT)' योजनेच्या अंमलबजावणीमध्ये ओडीशाने अव्वल स्थान मिळवले आहे.
अमृत योजनेबाबत ठळक मुद्दे
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत योजना जून २०१५ मध्ये सुरू केली होती.
-
सदर योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे आहे की शहरी बदलांसाठी मजबूत मलनिस्सारण आणि पाणीपुरवठा साखळी सुनिश्चित करेल अशी पायाभूत सुविधा स्थापन करणे.
-
ओडीशातील ९ अमृत शहरांमध्ये पाणीपुरवठा, मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पांचे बांधकाम आणि हरित जागांची सुधारणा तसेच सार्वत्रिक प्रसार यासाठी प्रयत्न केले गेले आहेत.
ओडीशा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्यपाल: गणेशीलाल हे सध्या ओडीशा राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
मुख्यमंत्री: नवीन पटनाईक हे सध्या ओडीशा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १ एप्रिल १९३६ रोजी ओडीशाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.
-
राजधानी: भुवनेश्वर ही ओडीशा राज्याची राजधानी आहे.