• भारतीय प्रादेशिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणालीला (Indian Regional Navigation Satellite System - IRNSS) हिंदी महासागर प्रदेशात काम करण्यासाठी जागतिक रेडिओ नेव्हिगेशन प्रणाली (World Wide Radio Navigation System - WWRNS) चा एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेमार्फत (International Maritime Organisation - IMO) मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेद्वारे (IMO) मान्यता प्राप्त स्वतंत्र प्रादेशिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली स्विकारणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे.

  • IMO द्वारे मान्यता प्राप्त इतर ३ देशांमध्ये अमेरिका, रशिया आणि चीन यांचा समावेश आहे.

  • IRNSS ची रचना हिंदी महासागरातील जहाजांमध्ये नेव्हिगेशनसह अचूक स्थान सेवा प्रदान करण्यासाठी करण्यात आली आहे.

  • IRNSS चा उपयोग भारतीय सीमेवरील सुमारे १५०० कि.मी. क्षेत्रातील जहाजांमध्ये नेव्हिगेशन करण्यात मदत करण्यासाठी केला जाईल अशी अपेक्षा आहे.