-
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (International Labour Organization - ILO) नियामक मंडळाचे अध्यक्षपद तब्बल ३५ वर्षानंतर भारताला बहाल करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
कामगार व रोजगार सचिव असणाऱ्या श्री. अपूर्व चंद्र यांची ऑक्टोबर २०२० ते जून २०२१ या कालावधीसाठी ILO च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
-
श्री. चंद्र हे महाराष्ट्र कॅडरचे १९८८ सालच्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत.
ILO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ILO म्हणजेच International Labour Organization अर्थात आंतरराष्ट्रीय कामगार संघटना होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे ILO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १९१९ साली ILO ची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्य महासंचालक: गाय रायडर हे सध्या मुख्य महासंचालक पदावर कार्यरत आहेत.
-
संस्थेचा प्रकार: संयुक्त राष्ट्रांची विशेष एजन्सी या स्वरूपात ILO सध्या कार्यरत आहे.
-
सदस्यत्व: ILO चे सध्या १८७ सदस्य देश आहेत.
ILO प्रशासकीय मंडळाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
संस्थेचे स्वरूप: प्रशासकीय मंडळ (Governing body) ही ILO ची सर्वोच्च कार्यकारी संस्था या स्वरूपात कार्यरत आहे.
-
संस्थेची कार्ये: धोरणे, कार्यक्रम, अजेंडा, बजेट ठरवणे आणि महासंचालकांची निवड करणे इ. महत्वपूर्ण कार्ये प्रशासकीय मंडळामार्फत पार पाडण्यात येतात.
-
बैठक कालावधी: वर्षातून ३ वेळा मंडळाची बैठक घेण्यात येते.