-
केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे मोठ्या धरणांवरील आंतरराष्ट्रीय आयोग (International Commission on Large Dams - ICOLD) परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
'धरणे व नदी पात्रांचा शाश्वत विकास (Sustainable Development of Dams & River Basins)' ही सदर परिसंवादाची थीम आहे.
-
सदर चर्चासत्रात देश-विदेशातील ३०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
-
केंद्रीय जल आयोग (Central Water Commission - CWC), धरण पुनर्वसन सुधार प्रकल्प (Dam Rehabilitation Improvement Project - DRIP) आणि राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प (National Hydrology Project - NHP) यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथे या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
ICOLD बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ICOLD म्हणजेच International Commission on Large Dams अर्थात मोठ्या धरणांवरील आंतरराष्ट्रीय आयोग होय.
-
अध्यक्षः मायकेल रॉजर्स हे सध्या ICOLD च्या अध्यक्षपदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १९२८ साली ICOLD ची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: पॅरिस, फ्रान्स हे ICOLD च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.