• ऑस्ट्रेलियान सलामीवीर डेव्हिड वॉर्नर तसेच वेस्ट इंडिजची अष्टपैलू खेळाडू हेली मॅथ्यूज यांना नोव्हेंबरसाठीचा 'आयसीसी प्लेयर्स ऑफ द मंथ (ICC Player Of The Month)' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • वॉर्नर हा पाकिस्तानचा आबिद अली तसेच न्यूझीलंडचा टिम साउथी यांच्यासमवेत या पुरस्कारासाठी नामांकित होता.

ICC बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ICC म्हणजेच International Cricket Council अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद होय.

  • स्थापना वर्ष: १५ जून १९०९ रोजी ICC ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: दुबई, अरब अमिराती हे ICC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सध्याचे चेअरमन: ग्रेग बार्कले हे सध्या ICC च्या चेअरमन पदाची धुरा सांभाळत आहेत.

  • सध्याचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी: जॉफ अलार्डिस हे सध्या ICC च्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा भार सांभाळत आहेत.

  • सदस्य देश: जगभरातील १०४ देश ICC चे सदस्य देश आहेत.

  • ब्रीदवाक्य: 'Cricket for good' हे ICC चे ब्रीदवाक्य आहे.