-
'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमार्फत (International Cricket Council - ICC)' क्रिकेट जगतातील दिग्गज महेला जयवर्धने (श्रीलंका), शॉन पोलॉक (दक्षिण आफ्रिका) आणि जॅनेट ब्रिटिन (इंग्लंड) यांना हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
ICC हॉल ऑफ फेम हे क्रिकेटच्या प्रदीर्घ तसेच गौरवशाली इतिहासातील दिग्गजांच्या कर्तृत्वाला मान्यता देण्याचे कार्य करते.
-
२००९ मध्ये अनावरण झाल्यापासून १०६ खेळाडूंचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
ICC बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ICC म्हणजेच International Cricket Council अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद होय.
-
स्थापना वर्ष: १५ जून १९०९ रोजी ICC ची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: दुबई, अरब अमिराती हे ICC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सध्याचे चेअरमन: ग्रेग बार्कले हे सध्या ICC च्या चेअरमन पदाची धुरा सांभाळत आहेत.
-
सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी: मनु सावनी हे सध्या ICC च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा भार सांभाळत आहेत.
-
सदस्य देश: जगभरातील १०४ देश ICC चे सदस्य देश आहेत.
-
ब्रीदवाक्य: 'Cricket for good' हे ICC चे ब्रीदवाक्य आहे.