• जन स्मॉल फायनान्स बँकेमार्फत (Jana Small Finance Bank) संपूर्ण भारतभरातील ग्राहकांसाठी ‘आय चूज माय नंबर (I choose my number)’ वैशिष्ट्याचे अनावरण करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर नवीन वैशिष्ट्य बँकेच्या विद्यमान तसेच नवीन ग्राहकांना त्यांची आवडती संख्या त्यांचा बचत किंवा चालू खाते क्रमांक म्हणून निवडण्याचा पर्याय देते.

जन स्मॉल फायनान्स बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती

  • व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: अजय कानवाल हे सध्या बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: २४ जुलै २००६ रोजी बँकेची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: बेंगळुरू हे बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • बँकेची टॅगलाईन: ‘पैसे की कदर’ ही बँकेची टॅगलाईन आहे.