• ICICI बँकेमार्फत ‘होम उत्सव (Home Utsav)’ या नावाने व्हर्च्युअल प्रॉपर्टी प्रदर्शन सुरू करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनाच्या माध्यमातून संपूर्ण भारत भरातील नामवंत विकासकांकडून रिअल इस्टेट प्रकल्प डिजीटल माध्यमाद्वारे प्रदर्शित करण्यात येणार आहे. www.homeutsavicici.com या संकेतस्थळाद्वारे या प्रदर्शनात प्रवेश करणे शक्य आहे.

ठळक मुद्दे

  • ICICI बँकेचे ग्राहक असणारे तसेच नसणारे या प्रदर्शनात प्रवेश करू शकतात अशी सुविधा पुरवण्यात आली आहे.

  • पहिले ‘होम उत्सव’ प्रदर्शन मुंबई आणि पुणे विभागासाठी सुरू करण्यात आले असून तेथे ६० हून अधिक विकासकांच्या १०० हून अधिक प्रकल्पांचे प्रदर्शन केले जाणार आहे.

ICICI बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ICICI म्हणजेच Industrial Credit and Investment Corporation of India होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे ICICI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • अध्यक्ष: गिरीश चंद्र चतुर्वेदी हे सध्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत.

  • व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: संदीप बक्षी सध्या या पदावर कार्यरत आहेत.

  • बँकेची टॅगलाईनः 'हम है ना, खयाल आपका' ही ICICI बँकेची टॅगलाईन आहे.