• राज्यभर घरी असलेल्या कोविड - १९ रूग्णांची नियमित देखरेख व तपासणी करण्यात यावी यासाठी बिहार सरकारमार्फत ‘HIT कोविड अ‍ॅप (Covid App)’ चे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • एचआयटी (HIT) म्हणजे होम आयसोलेशन ट्रॅक (Home Isolation Tracks) होय.

  • मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या हस्ते सदर उपक्रमाचे अनावरण करण्यात आले.

बिहार राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्यपाल: फागु चौहान हे सध्या बिहारचे राज्यपाल आहेत.

  • मुख्यमंत्री: नितीशकुमार हे सध्या बिहारचे मुख्यमंत्री आहेत.

  • स्थापना वर्ष: १९१२ साली बिहार राज्याची स्थापना करण्यात आली होती.

  • राज्य दर्जा प्राप्त वर्ष: १९५० साली बिहारला राज्य दर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: पटना ही बिहारची राजधानी आहे.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने बिहारचा देशात १२ वा क्रमांक लागतो.