-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळामार्फत जम्मू-काश्मीर भाषा विधेयक, २०२० ला मंजुरी देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
उर्दू, हिंदी, डोगरी, इंग्रजी आणि काश्मिरी या ५ भाषांना केंद्रशासित प्रदेशाची अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
-
कलम ३७० रद्द करण्यापूर्वी उर्दू आणि इंग्रजी यांना राज्याच्या अधिकृत भाषा म्हणून मान्यता होती.
-
नवीन दुरुस्तीनुसार यामध्ये हिंदी, डोगरी आणि काश्मिरी भाषा समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
कलम ३४३ बाबत महत्वपूर्ण माहिती
-
सदर कलमानुसार हिंदी ही देवनागरी लिपीमध्ये बद्ध स्वरूपात संघाची अधिकृत भाषा असेल.
-
यामध्ये असेही म्हटले आहे की अंकांचा वापर आंतरराष्ट्रीय स्वरूपात करण्यात येईल.
-
राज्यघटनेच्या आमलानंतर १५ वर्षांपर्यंत इंग्रजी भाषा ही अधिकृत भाषा म्हणून राहील.
-
१५ वर्षानंतर हिंदी भाषेचा अतिरिक्त अधिकृत भाषा म्हणून वापर करण्याच्या राष्ट्रपतींच्या आदेशानुसार हे बदलले जाऊ शकते.
-
भारत सरकारमार्फत हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचा अधिकृत भाषा म्हणून सध्या वापर करण्यात येत आहे.
८ व्या अनुसूचीबाबत महत्वपूर्ण माहिती
-
भारतीय राज्यघटनेतील ८ व्या अनुसूचीमध्ये २२ अनुसूचित भाषांना राज्यांची अधिकृत भाषा म्हणून सूचीबद्ध करण्यात आले आहे.
-
राज्यांना अनुसूचित भाषांमधून आपली अधिकृत भाषा निवडण्याची सक्ती करण्यात आलेली नाही.