• हिमाचल प्रदेश सरकारने कोविड-१९ बद्दल तसेच टीबी, कुष्ठरोग, मधुमेह आणि रक्तदाब यासारख्या आजारांबाबत लोकांना संवेदनशील करत त्यांच्या लक्षणांविषयी माहिती गोळा करण्यासाठी ‘हिम सुरक्षा अभियान (Him Suraksha Abhiyan)’ सुरू केले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर अभियानांतर्गत आरोग्य, आयुर्वेद, महिला व बालविकास, पंचायत राज विभाग, जिल्हा प्रशासन तसेच स्वयंसेवी संस्था यांचा समावेश असणाऱ्या जवळपास ८००० संघांचा सहभाग असेल अशी अपेक्षा आहे.

  • लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण घटकांचे प्रत्येक घरी जाऊन माहिती संकलन सुनिश्चित करण्यात येणार आहे.

हिमाचल प्रदेश राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी केंद्र शासित प्रदेश म्हणून स्थापना तर २५ जानेवारी १९७१ रोजी राज्यदर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: शिमला ही हिमाचल प्रदेशची उन्हाळी तर धरमशाला ही हिंवाळी राजधानी आहे.

  • राज्यपाल: बंदारू दत्तात्रेय हे सध्या राज्याच्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यमंत्री: जय राम ठाकूर हे सध्या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने हिमाचल प्रदेश राज्याचा देशात १७ वा क्रमांक लागतो.