-
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेमार्फत (Defence Research and Development Organisation - DRDO) स्वदेशी विकसित हेलिना आणि ध्रुवास्त्र अँटी-टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्रांची (Anti-Tank Guided Missiles - ATGM) यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
हेलिना ही लष्करी आवृत्ती असून ध्रुवास्त्र ही हवाई आवृत्ती आहे.
-
DRDO मार्फत सदर स्वदेशी क्षेपणास्त्र यंत्रणेची रचना तसेच विकास करण्यात आला आहे.
DRDO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: DRDO म्हणजेच Defence Research and Development Organisation अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था होय.
-
अध्यक्ष: डॉ. जी. सतीश रेड्डी हे सध्या DRDO चे अध्यक्ष आहेत.
-
स्थापना वर्ष: १९५८ साली DRDO ची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे DRDO चे मुख्यालय आहे.
-
संस्थेचे ब्रीदवाक्य: 'बलस्य मूलं विज्ञानम्' हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.