• माजी SBI कार्ड प्रमुख श्री. हरदयाल प्रसाद यांची PNB हाउसिंग फायनान्सने नवे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • श्री. प्रसाद हे सध्याचे अंतरिम व्यवस्थापकीय संचालक आणि कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज व्यास यांच्यानंतर पदभार स्वीकारतील.

  • श्री. व्यास १० ऑगस्टला आपल्या पदावरून पायउतार होतील.

PNB हाउसिंग फायनान्सबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्य कार्यालय: नवी दिल्ली येथे PNB हाउसिंग फायनान्सचे मुख्य कार्यालय आहे.

  • स्थापना वर्ष: ११ नोव्हेंबर १९८८ साली PNB हाउसिंग फायनान्सची स्थापना झाली होती.

  • संस्थेचे स्वरूप: खाजगी कंपनीच्या स्वरूपात PNB हाउसिंग फायनान्स कार्यरत आहे.

  • टॅगलाईन: 'घर की बात' ही PNB हाउसिंग फायनान्सची टॅगलाईन आहे.