• नीती आयोगाने भारताचा भू-स्थानिक ऊर्जा नकाशा (Geospatial Energy Map) नुकताच 'भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organization - ISRO)' आणि भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या सहकार्याने विकसित केला आहे.

ठळक मुद्दे

  • सदर नकाशा हा देशाच्या सर्व ऊर्जा संसाधनांचे समग्र चित्र प्रदान करेल अशी अपेक्षा आहे.

NITI आयोगाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: NITI म्हणजेच National Institution for Transforming India अर्थात भारत परिवर्तनासाठी राष्ट्रीय संस्था होय.

  • स्थापना वर्ष: १ जानेवारी २०१५ साली नीती आयोगाची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे नीती आयोगाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • अध्यक्ष: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगाच्या अध्यक्ष पदावर आहेत.

  • उपाध्यक्ष: राजीव कुमार हे नीती आयोगाच्या उपाध्यक्ष पदावर आहेत.

  • मुख्य कार्यकारी अधिकारी: अमिताभ कांत हे नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर आहेत.

ISRO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ISRO म्हणजेच Indian Space Research Organization अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था होय.

  • सध्याचे अध्यक्ष: के. सिवन हे सध्या ISRO च्या अध्यक्ष पदावर आहेत.

  • स्थापना वर्ष: १५ ऑगस्ट १९६९ रोजी ISRO ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: बंगळुरू, कर्नाटक हे ISRO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.