• HSBC इंडियामार्फत 'ग्रीन डिपॉझिट प्रोग्राम' सुरू करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम हा केवळ कॉर्पोरेट ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमांतर्गत हरित पुढाकार आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी बँक ठेवींचा वापर करेल अशी अपेक्षा आहे.

ठळक मुद्दे

  • बँकेमार्फत सुरू केलेली ठेव योजना आपल्या कॉर्पोरेट ग्राहकांना स्थिर परतावा तसेच सामान्य बँक ठेवीप्रमाणे संरक्षण प्रदान करेल.

  • 'ग्रीन डिपॉझिट प्रोग्राम' अंतर्गत येणारी ठेव बचत इतर ठेवींच्या तुलनेत उच्च मुदतीसह ठेवली जाईल.

  • सदर योजना पात्र व्यवसाय आणि प्रकल्पांना वित्तपुरवठा करेल जे अल्प-कार्बन आणि शाश्वत अर्थव्यवस्थेच्या संक्रमणाला प्रोत्साहित करण्याचे कार्य करतील.

HSBC India बाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १८५३ साली HSBC India ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे HSBC India चे मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • मुख्य कार्यकारी अधिकारी: सुरेंद्र रोशा हे सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर विराजमान आहेत.

  • संस्थेचा प्रकार: वित्त आणि विमा या प्रकारात HSBC India ही संस्था येते.