• भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक म्हणून प्रसिद्ध असणारे प्रा. गोविंद स्वरूप यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांचा जन्म २३ मार्च १९२९ रोजी तत्कालीन ब्रिटिश भारतातील ठाकूरद्वारा, संयुक्त प्रांत (आत्ताच्या उत्तर प्रदेशात) येथे झाला होता.

ठळक मुद्दे

  • ते टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (Tata Institute of Fundamental Research - TIFR) नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सचे (National Centre for Radio Astrophysics) संस्थापक संचालक म्हणून कार्यरत होते.

  • ऊटी रेडिओ दुर्बिण आणि जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलीस्कोप (Giant Metrewave Radio Telescope - GMRT) यांची संकल्पना, रचना आणि स्थापना यामागे गोविंद स्वरूप यांची महत्त्वाची भूमिका होती.

  • त्यांच्या कार्यामुळे रेडिओ खगोलशास्त्राच्या संशोधनासाठी भारताला अग्रगण्य देश म्हणून प्रसिद्धी प्राप्त झाली होती.

गोविंद स्वरूप यांच्या कामगिरीबाबत महत्वपूर्ण माहिती

  • १९७३ साली त्यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला होता.

  • १९७५-७७ या कालावधीदरम्यान त्यांनी भारतीय खगोलशास्त्र संस्थेचे (Astronomical Society of India) अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.

  • १९७२ साली त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान साठी शांती स्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला होता.

  • त्यांना १९८८ साली भौतिकशास्त्रातील टीडब्ल्यूएएस (TWAS) पुरस्कार प्राप्त झाला होता.

  • २००१ मध्ये एच. के. फिरोदिया पुरस्कार आणि २००७ मध्ये ग्रोटे रेबर मेडल हे इतर पुरस्कार प्राप्त झाले होते.