-
महाराष्ट्र सरकारमार्फत नागपुरातील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाचे नाव बदलून ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीशास्त्र उद्यान’ असे ठेवण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर प्राणी उद्यान जवळपास २ हजार हेक्टर वनजमिनीवर येईल अशी अपेक्षा आहे.
-
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्राणीसंग्रहालयात भारतीय सफारीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: उद्धव ठाकरे हे सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळत आहेत.
-
राज्यपाल: भगतसिंग कोश्यारी हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.
-
राज्य स्थापना वर्ष: १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती.
-
राजधानीचे ठिकाण: मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो.