• गोव्याची पारंपारिक उत्सवातील स्वीट डिश ‘खाजे’, मसालेदार हरमल मिरची आणि मायंडोली केळी अर्थात मोइरा केळी यांना भौगोलिक निर्देशांक(Geographical Indication - GI) टॅग भौगोलिक निर्देशांक नोंदणी कार्यालयामार्फत (Geographical Indications Registry) प्राप्त झाला आहे.

जीआय (Geographical Indication - GI) टॅग बाबत ठळक मुद्दे

  • भारतातील भौगोलिक निर्देशांक नोंदणी ही 'वस्तूंची भौगोलिक नोंदणी आणि संरक्षण अधिनियम (Geographical Indications of Goods (Registration and Protection Act), १९९९' द्वारे केली जाते जी सप्टेंबर २००३ पासून अंमलात आणली गेली.

  • GI टॅगमुळे उत्पादनांचा बेकायदेशीर वापर होण्यापासून संरक्षण मिळते आणि स्थानिक उत्पादकांना त्याचा फायदा होतो.

  • भौगोलिक निर्देशांक नोंदणी कार्यालयाचे मुख्यालय चेन्नई, तमिळनाडू येथे आहे.

गोवा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राजधानी: पणजी ही गोव्याची राजधानी आहे.

  • राज्यपाल: सत्य पाल मलिक हे सध्या गोव्याच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

  • मुख्यमंत्री: प्रमोद सावंत हे सध्या गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

  • राज्य निर्मिती वर्ष: १९८७ साली गोवा राज्याची स्थापना झाली होती.