• गुजरातचे मुख्यमंत्री श्री. भूपेंद्र पटेल यांच्यामार्फत नुकतेच ‘गो-ग्रीन (Go Green)’ नावाच्या योजना आणि पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • राज्यातील औद्योगिक कामगारांना सवलतीच्या दरात इलेक्ट्रिक दुचाकी देणे हा सदर योजनेमागील मुख्य हेतू आहे.

  • इंधन बिले कमी करणे तसेच वाहनांच्या प्रदूषणाला आळा घालणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

गुजरात राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: भूपेंद्र पटेल हे सध्या गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.

  • राज्यपाल: आचार्य देव व्रत हे सध्या गुजरातच्या राज्यपाल पदावर आहेत.

  • स्थापना वर्ष: १ मे १९६० रोजी गुजरात राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी: गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने गुजरातचा देशात ५ वा क्रमांक लागतो.