• नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या 'जागतिक उत्पादन जोखीम निर्देशांकामध्ये (Global Manufacturing Risk Index)' भारत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.

ठळक मुद्दे

  • जागतिक उत्पादन केंद्र म्हणून उदयास येताना भारताने अमेरिकेला मागे टाकत सदर स्थान पटकाविले आहे.

  • 'कुशमन अँड वेकफिल्डच्या (Cushman & Wakefield)' २०२१ सालच्या 'जागतिक उत्पादन जोखीम निर्देशांकामध्ये (Global Manufacturing Risk Index) भारताची ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.

  • सदर निर्देशांकामध्ये युरोप, अमेरिका तसेच आशिया-पॅसिफिकमधील ४७ देश समाविष्ट करण्यात आले आहेत.