• इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटमार्फत (Economist Intelligence Unit - EIU) प्रकाशित करण्यात आलेल्या 'जागतिक जीवनमान निर्देशांक (Global Liveability Index)' २०२१ मध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामधील शहरांनी आपले वर्चस्व निर्माण केले आहे.

ठळक मुद्दे

  • कोविड - १९ जलद गतीने रोखण्याची क्षमता दाखवल्यामुळे न्यूझीलंडच्या ऑकलंडला जीवनमान क्रमवारीत अव्वल स्थान देण्यात आले आहे.

  • ओसाका आणि टोकियो या जपानी शहरांनी या क्रमवारीत अनुक्रमे दुसरे आणि चौथे स्थान पटकावले आहे.

  • ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडलेड तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे.

  • सिरियाची राजधानी दमास्कस या यादीत तळाच्या स्थानावर आहे.

जागतिक क्रमवारी अव्वल शहरे

  • ऑकलंड (न्यूझीलंड)

  • ओसाका (जपान)

  • अ‍ॅडलेड (ऑस्ट्रेलिया)

  • वेलिंग्टन (न्यूझीलंड)

  • टोकियो (जपान)

जागतिक क्रमवारी तळाची शहरे

  • दमास्कस (सिरिया)

  • लागोस (नायजेरिया)

  • पोर्ट मोरेस्बी (पापुआ न्यू गिनी)

  • ढाका (बांगलादेश)

  • अल्जियर्स (अल्जेरिया)