-
केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते व्हर्च्युअल माध्यमातून नवी दिल्ली येथे 'ग्लोबल बायो इंडिया (Global Bio India) २०२१' च्या दुसर्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
१ ते ३ मार्च २०२१ या कालावधीत सदर ३ दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन डिजीटल व्यासपीठावर करण्यात आले आहे.
-
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या जैव-तंत्रज्ञान क्षेत्रामधील शक्ती व संधी दर्शविणे हा सदर कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
-
२०२५ पर्यंत १५० अब्ज डॉलर्सची जैव-अर्थव्यवस्था उभारण्याचे भारत सरकारचे ध्येय आहे.
-
'जैव-अर्थव्यवस्थेचे जैवविज्ञान (Biosciences to Bio-economy)' या टॅगलाईनसह 'जीवनात बदल (Transforming lives)' ही 'ग्लोबल बायो इंडिया (Global Bio India) २०२१' ची थीम आहे.