• मणिपूरच्या सिराराखोंग मिरचीला आणि तमेंगलोंग संत्र्याला नुकताच 'भौगोलिक निर्देशांक [Geographical Indication (GI) tag]' प्रदान करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • मणिपूरसाठी हा एक ऐतिहासिक क्षण असून यामुळे तेथील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल अशी अपेक्षा आहे.

जीआय (Geographical Indication - GI) टॅग बाबत महत्वपूर्ण माहिती

  • भारतातील भौगोलिक निर्देशांक नोंदणी ही 'वस्तूंची भौगोलिक नोंदणी आणि संरक्षण अधिनियम [Geographical Indications of Goods (Registration and Protection Act), १९९९]' द्वारे केली जाते जी सप्टेंबर २००३ पासून अंमलात आणली गेली.

  • GI टॅगमुळे उत्पादनांचा बेकायदेशीर वापर होण्यापासून संरक्षण मिळते आणि स्थानिक उत्पादकांना त्याचा फायदा होतो.

  • भौगोलिक निर्देशांक नोंदणी कार्यालयाचे मुख्यालय चेन्नई, तमिळनाडू येथे आहे.

मणिपूर राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: एन. बिरेन सिंग हे सध्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • राज्यपाल: ला. गणेशन हे सध्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • भारतात विलीनीकरण: १५ ऑक्टोबर १९४९ रोजी मणिपूरचे भारतात विलीनीकरण संपन्न झाले होते.