• कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणामार्फत (Agriculture and Processed Food Products Export Development Authority - APEDA) आसामच्या तेजपूर लिचीला भौगोलिक निर्देशांक (Geographical Indication - GI) प्रदान करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • ईशान्य प्रादेशिक कृषी विपणन महामंडळ मर्यादितद्वारे (North Eastern Regional Agricultural Marketing Corporation Ltd - NERAMAC) २०१३ मध्ये भौगोलिक निर्देशांक प्राप्त करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता.

  • तेजपूरमधील लीची उत्कृष्ट गुणवत्ता, चव तसेच आकर्षक लाल रंगासाठी प्रसिद्ध आहे.

जीआय (Geographical Indication - GI) टॅग बाबत महत्वपूर्ण माहिती

  • भारतातील भौगोलिक निर्देशांक नोंदणी ही 'वस्तूंची भौगोलिक नोंदणी आणि संरक्षण अधिनियम [Geographical Indications of Goods (Registration and Protection Act), १९९९]' द्वारे केली जाते जी सप्टेंबर २००३ पासून अंमलात आणली गेली.

  • GI टॅगमुळे उत्पादनांचा बेकायदेशीर वापर होण्यापासून संरक्षण मिळते आणि स्थानिक उत्पादकांना त्याचा फायदा होतो.

  • भौगोलिक निर्देशांक नोंदणी कार्यालयाचे मुख्यालय चेन्नई, तमिळनाडू येथे आहे.

आसाम राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राजधानी: दिसपूर ही सध्या आसामची राजधानी आहे.

  • राज्यपाल: जगदीश मुखी हे सध्या राज्यपाल पदावर आहेत.

  • मुख्यमंत्री: सर्वानंद सोनोवाल हे सध्या मुख्यमंत्री पदावर आहेत.

  • राज्यदर्जा प्राप्त वर्ष: २६ जानेवारी १९५० रोजी आसामला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.