-
आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये भारताच्या GDP दरात ६.७% नी घसरण होण्याचा अंदाज बोफा सिक्युरिटीजमार्फत (BofA Securities) नुकताच व्यक्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
बोफा सिक्युरिटीजने नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारतात लस वितरण करण्यात आल्यास २०२१-२२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ९ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज वर्तविला आहे.
-
मात्र सदर लस वितरण दुसऱ्या सहामाहीत झाल्यास GDP वाढीची शक्यता केवळ ६ टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे.
बोफा सिक्युरिटीजबाबत (BofA Securities) महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १ जानेवारी २००९ रोजी सदर संस्थेची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स हे बोफा सिक्युरिटीजच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
मुख्य कार्यकारी अधिकारी: ब्रायन टी. मोयनिहान हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.
-
पालक संस्था: बँक ऑफ अमेरिका ही सदर संस्थेची पालक संस्था आहे.