-
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमार्फत (International Monetary Fund - IMF) भारतीय अर्थव्यवस्थेच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षातील GDP वाढीचा अंदाज १२.५ टक्के इतका व्यक्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर सुधारित अंदाज IMF च्या 'वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकमध्ये (World Economic Outlook)' प्रकाशित करण्यात आले आहेत.
IMF बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: IMF म्हणजेच International Monetary Fund अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी होय.
-
स्थापना वर्ष: १९४५ साली IMF ची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: वॉशिंग्टन, डीसी, युनायटेड स्टेट्स हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
व्यवस्थापकीय संचालक: क्रिस्टलिना जॉर्जिएवा या पदावर विराजमान आहेत.
-
सदस्य देश: IMF चे १८९ सदस्य देश आहेत. अँडोरा नुकताच १९० वा सदस्य म्हणून सामील झाले आहे.