• 'भारतीय निवडणूक आयोगामार्फत (Election Commission of India - ECI)' नुकतेच 'गरुड (Garuda)' नावाच्या अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • निवडणुकीचे काम जलद आणि पारदर्शक व्हावे या मुख्य उद्देशासाठी सर्व मतदान केंद्रांच्या डिजीटल मॅपिंगसाठी या अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले आहे.

  • कागदोपत्री काम कमी करण्यातही या अ‍ॅपची मदत होईल अशी अपेक्षा आहे.

ECI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ECI म्हणजेच Election Commission of India अर्थात भारतीय निवडणूक आयोग होय.

  • मुख्य निवडणूक आयुक्त: सुशील चंद्रा हे सध्या मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • निवडणूक आयुक्त: राजीव कुमार आणि अनुपचंद्र पांडे हे सदर पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: २५ जानेवारी १९५० रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.