-
जी-२० परराष्ट्र मंत्र्यांच्या व्हर्च्युअल स्वरूपात पार पडलेल्या असाधारण बैठकीचे अध्यक्षस्थान सौदी अरेबियाने बजावले.
ठळक मुद्दे
-
कोविड-१९ सारख्या महामारीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या व्हर्च्युअल बैठकीत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
-
कोरोनाच्या संकटादरम्यान सीमा पार करून आंतरराष्ट्रीय सहकार्य बळकट करण्याबाबत सहभागी देशांनी चर्चा केली.
-
साथीला प्रतिसाद म्हणून घेतल्या गेलेल्या व्यवस्थापन पुढाकारातून आलेल्या राष्ट्रीय अनुभवांबद्दल यामध्ये विस्तृत चर्चा करण्यात आली.
जी-२० बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: जी-२० (G-२०) म्हणजेच Group of Twenty अर्थात २० देशांचा समूह होय.
-
स्थापना वर्ष: १९९९ साली जी-२० ची स्थापना झाली होती.
-
सध्याचे अध्यक्ष: किंग सलमान बिन अब्दुलाझिज अल सौद हे सध्या जी-२० च्या अध्यक्षस्थानावर आहेत.
-
संस्थेचे उद्दिष्ट: आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याबाबत प्रमुख मंच म्हणून प्रत्येक खंडातील विकसित आणि विकसनशील देशांच्या नेत्यांना एकत्र आणणे हे जी-२० चे मुख्य उद्दिष्ट आहे.
-
जी-२० गटातील सदस्य देश: युनायटेड स्टेट्स, युरोपियन युनियन, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, कोरिया प्रजासत्ताक, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, टर्की, युनायटेड किंगडम हे जी-२० गटातील सदस्य देश आहेत.