• नुकतीच जी-२० देशांच्या पर्यावरण मंत्र्यांची बैठक (Environment Ministerial Meeting - EMM) सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपन्न झाली.

ठळक मुद्दे

  • केंद्रीय पर्यावरण, हवामान बदल, आणि वनमंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांनी बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले.

  • जी-२० पर्यावरण मंत्र्यांच्या या मेळाव्यामध्ये भू-अधोगती आणि कोरल रीफ कार्यक्रम कमी करण्यासाठी (Global Initiative to reduce Land Degradation and Coral Reef program) जागतिक पुढाकार सुरू करण्यात आला आहे.

जी-२० बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: जी-२० (G-२०) म्हणजेच Group of Twenty अर्थात २० देशांचा समूह होय.

  • स्थापना वर्ष: १९९९ साली जी-२० ची स्थापना झाली होती.

  • सध्याचे अध्यक्ष: किंग सलमान बिन अब्दुलाझिज अल सौद हे सध्या जी-२० च्या अध्यक्षस्थानावर आहेत.

  • संस्थेचे उद्दिष्ट: आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याबाबत प्रमुख मंच म्हणून प्रत्येक खंडातील विकसित आणि विकसनशील देशांच्या नेत्यांना एकत्र आणणे हे जी-२० चे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • जी-२० गटातील सदस्य देश: युनायटेड स्टेट्स, युरोपियन युनियन, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, कोरिया प्रजासत्ताक, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, टर्की, युनायटेड किंगडम हे जी-२० गटातील सदस्य देश आहेत.