• २०२० सालची जी-२० नेत्यांची बैठक शेर्पा ट्रॅकचा (Sherpa Track) एक भाग म्हणून संपन्न होईल. शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन २०२० च्या शेवटी सौदी अरेबियामार्फत करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • सौदी अरेबियाकडून जी-२० च्या २०२० साठीच्या उपक्रमांसाठी 'सर्वांसाठी २१ व्या शतकातील संधी ओळखणे (Realizing Opportunities of the 21st Century For All)' या थीमची निवड करण्यात आली आहे.

  • सौदी अरेबियाचे शिक्षणमंत्री डॉ. हमाद अल-अशिख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या व्हर्च्युअल बैठकीत केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. रमेश पोखरीयल 'निशंक' यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.

जी-२० बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: जी-२० (G-२०) म्हणजेच Group of Twenty अर्थात २० देशांचा समूह होय.

  • स्थापना वर्ष: १९९९ साली जी-२० ची स्थापना झाली होती.

  • सध्याचे अध्यक्ष: किंग सलमान बिन अब्दुलाझिज अल सौद हे सध्या जी-२० च्या अध्यक्षस्थानावर आहेत.

  • संस्थेचे उद्दिष्ट: आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याबाबत प्रमुख मंच म्हणून प्रत्येक खंडातील विकसित आणि विकसनशील देशांच्या नेत्यांना एकत्र आणणे हे जी-२० चे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • जी-२० गटातील सदस्य देश: युनायटेड स्टेट्स, युरोपियन युनियन, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, कोरिया प्रजासत्ताक, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, टर्की, युनायटेड किंगडम हे जी-२० गटातील सदस्य देश आहेत.