• २०२३ मध्ये भारत जी-२० शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे.

ठळक मुद्दे

  • केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री. पियुष गोयल यांची २०२३ सालच्या जी-२० शिखर परिषदेसाठी 'भारताचे शेर्पा' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  • शेर्पा हा एक मुत्सद्दी म्हणून काम करतो जो शिखर परिषदेच्या आधी तयारीचे संपून काम जबाबदारीने पार पाडतो.

  • जी-२० संमेलनाची २०२१ सालची आवृत्ती रोम, इटली येथे आयोजित करण्यात येणार आहे.

  • २०२२ सालच्या जी-२० संमेलनाची बैठक इंडोनेशियातील बाली येथे आयोजित करण्यात येणार आहे.

जी-२० बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: जी-२० (G-२०) म्हणजेच Group of Twenty अर्थात २० देशांचा समूह होय.

  • स्थापना वर्ष: १९९९ साली जी-२० ची स्थापना झाली होती.

  • सध्याचे अध्यक्ष: मारिओ ड्रॅगी हे सध्या जी-२० च्या अध्यक्षस्थानावर आहेत.

  • संस्थेचे उद्दिष्ट: आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याबाबत प्रमुख मंच म्हणून प्रत्येक खंडातील विकसित आणि विकसनशील देशांच्या नेत्यांना एकत्र आणणे हे जी-२० चे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • जी-२० गटातील सदस्य देश: युनायटेड स्टेट्स, युरोपियन युनियन, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, कोरिया प्रजासत्ताक, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, टर्की, युनायटेड किंगडम हे जी-२० गटातील सदस्य देश आहेत.